39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गणपती विसर्जन दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी

गणपती विसर्जन दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी

0
46

गोंदिया, दि.3 : कोरणी घाट वाघनदीवरील पुल महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा असून सदर मार्गावर जड-अवजड व हलके वाहनांचे 24 तास आवागमन मोठ्या प्रमाणात सुरु असते. गणपती विसर्जनाकरीता येणारे जड-अवजड व हलके वाहन व त्यांचे सोबतचे इतर वाहनांची व नागरिकांची गर्दी होवून वाहतुकीची कोंडी होवून गंभीर स्वरुपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाहतुक कोंडीचा फायदा घेवून असामाजिक तत्वापासून धार्मिक भावना दुखावल्या जाईल असे कृत्य किंवा घातपात घडून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

        त्यामुळे मोटार अधिनियम 1988 चे कलम 115 चे तरतुदीनुसार तसेच शासकीय अधिसूचना-गृह विभाग दि.15 मे 1990 व 20 सप्टेंबर 1990 नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया प्रजित नायर यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील जड व अवजड वाहनांकरीता तात्पुरत्या स्वरुपात खालील पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी केले आहे.

        रावणवाडी ते रजेगाव-चंगेरा मार्ग रजेगाव (म.प्र.) या महामार्गावरुन जाणारी जड-अवजड व हलके वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग. छोटा रजेगाव-चंगेरा-सतोना ते वाघनदी पुलापर्यंत मार्ग गणेश विसर्जनाकरीता नमुद ठराविक वेळेपुरते सुरक्षीत ठेवण्यात आला असून, या एकेरी मार्गाने जड-अवजड व हलके वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे. तसेच छोटा रजेगाव फाट्यावरुन बालाघाटकडे जाण्याकरीता बालाघाट कडून येणाऱ्या वाहिनीतुन बालाघाटचे दिशेने जाण्याकरीता पर्यायी मार्ग जारी करण्यात येत आहे.

        सदर अधिसूचना स्थानिक कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पासून ते 7 सप्टेंबरचे सकाळी 4 वाजता पर्यंत. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पासून ते 8 सप्टेंबरचे सकाळी 4 वाजता पर्यंत. 8 सप्टेंबरचे सायंकाळी 6 वाजता ते 9 सप्टेंबरचे सकाळी 4 वाजता पर्यंत अंमलात राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.