37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये तहसिलदारांना निवेदन

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये तहसिलदारांना निवेदन

0
51

blank

सडक अर्जुनी,दि.०५ : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज व ओबीसी संघटनाच्यावतीने शासनाला सडक अर्जुनी येथील तहसिलदारमार्फत ४ सप्टेंबरला निवेदन पाठविण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या जीआरनुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत काढलेला निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे. तसेच पुन्हा सरकारने सगेसोयरेंच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी  दिनेश हुकरे,टिकाराम भेंडारकर,गंगाधर परशुरामकर,अरविंद मेंढे,रोशन बडोले,मधुसुधन दोनाडे,देवचंद तरोणे,राजेश कटाणे,राजेश कोरे,स्वप्नील ब्राम्हणकर,अनिल मुनेश्वर हेमराज मेंढे,चिलीया ब्राम्हणकर,किशोर शेंडे,प्रभाकर भेंडारकर,डी.टी.बावनकुळे,पुष्पा खोटेले आदी ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

blank