40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे 178 नागरिकांनी केली मोबाइल कॅंसर व्हॅनद्वारे तपासणी

ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे 178 नागरिकांनी केली मोबाइल कॅंसर व्हॅनद्वारे तपासणी

0
53

blank

गोरेगाव,दि.०५ःकर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन गोंदिया जिल्ह्यात दि.21 ऑगस्ट पासुन आरोग्य संस्थामध्ये कर्करोग तपासणी शिबीरे सुरु झाली आहेत.या अंतर्गत ४ सप्टेबरला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित तपासणी शिबिरात 178 नागरिकांनी मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आपली तपासणी केली.त्यात 92 मुख कर्करोग,46 महिलांची गर्भाशय कर्करोग व 40 महिलांची स्तन कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती वैद्यकिय अधिक्षक डॉ.विजय पटले यांनी दिली आहे

आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 32 आरोग्य संस्थेतील गावात मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन द्वारे महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.या व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये आहे.मोबाईल व्हॅनमध्ये ए.सी.तपासणी कक्ष असून मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र आहे.

मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्रद्धा शर्मा,मुखरोग तज्ज्ञ डॉ.प्रणव शेखर व शल्यचिकित्सक डॉ.विनु शर्मा,स्टाफ नर्स रेखा चुटे व सुरज गावडे यांनी लाभार्थ्यांची विविध तपासणी केली.

कॅन्सर तपासणी शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय पटले यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.कॅन्सर तपासणी शिबिराला ग्रामिण रुग्णालयाचे डॉक्टर,स्टाफ नर्सब्रदर्स तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,परिचर व इतर सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या मदतीने व जाणभागीदारीने हे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले.

blank