
अर्जुनी-मोर.-तालुक्यातील नवेगावबांधजवळ कोहमारा–अर्जुनी – मोरगाव राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नवेगाव बांध येथील तारेश मनोहर सांगोळकर (वय २५ वर्षे) यांचे अपघाती निधन झाले. पाठीमागून आलेल्या ॲम्बुलन्सच्या जोरदार धडकेमुळे झालेल्या या अपघातात तारेशचा जागीच मृत्यू झाला असून ही अत्यंत वेदनादायक घटना आहे.
गावातील कर्तृत्ववान, अभ्यासू आणि समाजाभिमुख असलेला हा तरुण दुर्दैवी अपघातात आपल्यातून निघून गेल्याने संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे.( ता.6) आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगोळकर कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत दुःखात सहभागी होवुन त्यांना धीर दिला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी उपसभापती होमराज पुस्तोडे, खरेदी विक्रीचे संचालक जयंत लांजेवार, माजी ग्रामपंचायत सदस्य शितल राऊत उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे नवेगावबांध येथील बबलु जैन यांच्या मातोश्री केसरबाई जैन यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.त्यांचेही घरी आमदार बडोले यांनी सांत्वनपर भेट दिली.





