39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ नेत्रदान पंधरवडा निमित्त नेत्रदानाबाबत जनजागृती

नेत्रदान पंधरवडा निमित्त नेत्रदानाबाबत जनजागृती

0
33

blank

विद्यार्थ्यांचे पथनाट्य, अधिकारी व समुपदेशकांचे मार्गदर्शन
गोंदिया : २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात साजरा होणार्‍या नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष उपक्रमात पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन आणि नेत्रदान मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ‘नेत्रदान हे दान नसून, एक जीवनप्रदायी कृती आहे. एका मृत व्यक्तीच्या नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना पुन्हा प्रकाश पाहता येतो.’ त्यांनी नेत्र प्रत्यारोपणाची प्रक्रिया, फायदे आणि याबाबतच्या गैरसमजांबाबतही माहिती दिली. जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ. खडके, सक्षम एनजीओचे प्रभाकर राव, सुषमा यादव, तसेच नेत्रदान समुपदेशक भाविका बघेल (जिल्हा सामान्य रुग्णालय) यांनी उपस्थितांना नेत्रदान प्रक्रियेबाबत सखोल माहिती दिली. ‘कोण नेत्रदान करू शकतो, कोण नाही करू शकत आणि मृत्यूनंतर किती वेळात नेत्रदान करता येते’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी सोप्या भाषेत दिली. कार्यक्रमाची खास आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांनी सादर केलेली पथनाटिका, ज्यामध्ये त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व अत्यंत प्रभावी रीतीने सादर केले. ‘नेत्रदान – प्रकाशाची भेट’ या संदेशाने सुसज्ज असलेली पथनाटिका प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर आणि चित्रांचे प्रदर्शन हेही नागरिकांचे लक्ष वेधून गेले. या उपक्रमाचे आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी कल्पना घोषाल आणि राजकुमार पटले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

blank