33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मोठे होण्यासाठी उंच स्वप्न पाहा – आमदार राजकुमार बडोले

मोठे होण्यासाठी उंच स्वप्न पाहा – आमदार राजकुमार बडोले

0
192

blank

अर्जुनी मोर.-“जीवनात मोठे व्हायचे असेल, तर लहान विचार करून चालत नाही. उंच स्वप्न पाहा, मोठे ध्येय ठेवा आणि त्या दिशेने प्रयत्न करा,” असे प्रतिपादन अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार *राजकुमार बडोले* यांनी केले.

मोरगाव येथे आयोजित नूतन महसूल अधिकारी कार्यालय चे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित झाले असताना आकस्मिक ,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगावला भेट दिली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार बडोले म्हणाले की, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच क्रीडा, कला आणि सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले.

“परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी या तीन गोष्टींच्या जोरावर कोणालाही यश मिळवता येते. गावागावातील मुलांनी मोठी स्वप्ने पाहून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे,” असेही बडोले म्हणाले. शालेय परिसर व शालेय उपलब्ध भौतिक सुविधा पाहून आमदारांनी समाधान व्यक्त केले व प्रगतीच्या आलेख सातत्याने वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सुद्धा केले. सदर शाळेतील सहाय्यक शिक्षिका रूपाली मेश्राम यांनी अलीकडेच सेट परीक्षा इंग्रजी विषयात पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्यामुळे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

सदर प्रसंगी अर्जुनी /मोर च्या सभापती आम्रपालीताई डोंगरवार अर्जुनी/ मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरूनकुमार सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे ,सरपंच गीताताई नेवारे जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते इंजिनियर यशवंत गणवीर माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, लोकपाल गहाणे, प्रदीप मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वेंकट खोब्रागडे ,लैलेश्वर शिवणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष तानाजी लोधी, महाराष्ट्र का मानबिंदू चे संपादक सुशील लाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे, पोलीस पाटील रमेश झोडे विद्या शहारे, प्रमिला शहारे, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

blank