
अर्जुनी-मोर. (१९ सप्टेंबर )–अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्र सव्वादोन तालुके मिळुन क्षेत्रफळानुसार मोठा आहे.आदिवासी नक्षलप्रभावीत व अतिदुर्गम भाग असल्याने येथे अनेक समस्या निर्माण होतात. त्या समस्याचे त्वरित निराकरण होवुन शासनाच्या विविध योजना व विकासात्मक कामे जलदगतीने व्हावे,जनतेच्या वैयक्तिक समस्या जाणुन घेवुन त्या मार्गी लागाव्या व गावाच्या विकासाला गती देण्यासाठी गांव संवाद दौरा आयोजित केला आहे.यामाध्यमातून गावातील शेतातील पांदण रस्त्यासाठी शासनाची महत्वाकांक्षी योजना सुरु झाली आहे.त्याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी या दौ-याच्या माध्यमातुन जनजागृती व्हावी हा उद्देश आहे.वनहक्क जमिनीचे पट्टे अर्जुनी-मोर. तालुक्यात चार हजार वाटप करण्यात तालुका आघाडीवर आहे.वनहक्क पट्टेधारकांना बोनस सोबत अन्य योजनांचा लाभ मिळावा तसेच घरकुल जागेसाठी पट्टे कसे मिळतील यासाठी शासनस्तरावर आपले प्रयत्न सुरु आहेत. ज्या शेतक-यांचे बोनस व धानाचे चुकारे बाकी आहेत.ते त्वरित मिळावे असे आपले प्रयत्न सुरु आहेत.असे प्रतिपादन या विभागाचे लोकप्रिय आमदार राजकुमार बडोले यांनी केले.
गाव संवाद दौऱ्याच्या अनुषंगाने पहिल्या दिवशी ता.18 चान्ना/बाकटी, सिलेझरी आणि निमगाव हे तीन गावांत आयोजीत संवादात आमदार बडोले बोलत होते.
यावेळी जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनीही गांव संवाद दौरा उपक्रमाची प्रशंशा करुन या निमित्ताने जनतेनी आपली कामे निकाली काढुन घ्यावी व विकासकामाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या गाव संवाद कार्यक्रमाचे निमीत्ताने उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी सेवा पंधरवाडा निमित्ताने महशुल विभागासंदर्भातील आपली अनेक कामे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे ,आम्ही शासनाचे वतीने तालुकास्तरीय प्रशासन तुमच्या सोबत आहोत.ज्या शेतक-यांचे वनहक्क जमिनीसंदर्भात प्रकरण रद्द झाले त्यांनी उपविभागासी संपर्क साधून जिल्हाधिकारी महोदयाकडे अपील करण्याचे आवाहन करुन वैयक्तिक प्रश्नाचे अडचणीसाठी प्रशासन तुमच्या सोबत आहे.अशी ग्वाही दिली.तालुकास्तरीय महशुलाचे प्रश्न सामोपचाराने सोडविण्याची ग्वाही तहशिलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.तसेच विद्युत विभाग,पाटबंधारे विभाग अशा विवीध विभागातील अडचणी निकाली काढण्याची ग्वाही त्या त्या विभागाच्या अधिका-यांनी दिली.
यावेळी तिन्ही गावातील नागरीकांनी आपआपल्या वैयक्तिक व गावविकासाच्या समस्या आमदार राजकुमार बडोले यांचे निदर्शनास आणुन दिल्या.त्यावर त्वरीत तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार बडोले यांनी दिले.
यावेळी पं. स. सभापती आम्रपालीताई डोंगरवार, जि. प. माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य यशवंत गणवीर, पं. स. उपसभापती संदिप कापगते, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य होमराज पुस्तोड, पं. स. सदस्य नाजूक कुंभरे, पं. स. सदस्या पुष्पलताताई दृगकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लोकपाल गहाने, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भोजराज लोगडे, व्यंकट खोब्रागडे, संजय खरवडे,उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,उपविभागीय अभियंता समीर बनसोडे, गट विकास अधिकारी पल्लवीताई धनविजे, महावितरणचे उपविभागीय अभियंता पाटील, राकेश लंजे, छगन पातोडे, सरपंच चान्ना सचिनकुमार डोंगरे, सरपंच सिलेझरी लताताई भेंडारकर, सरपंच निमगाव वंदेश्वरीताई राऊत, उपसरपंच चान्ना मोरेश्वर सोनवाणे, उपसरपंच सिलेझरी सुखदेव मेंढे, से.स.संस्था अध्यक्ष सुभास ब्राह्मणकर, वामन ब्राह्मणकर,प्रकाश टेंभुर्णे, प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





