36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता चिचगड रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

चिचगड रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
821

blank

एक लाखाची लाच घेताना अटक : नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गोंदिया : चिचगड ग्रामीण रुग्णालयात सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या पेन्शन तसेच रजेचे व इतर कामासाठी १.५ लाख रुपयांची लाच मागणारा सहाय्यक अधीक्षकास नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय चिंचगड येथे करण्यात आली. मनोज बाबुलाल जांभुळकर (वय 57 वर्ष, पद सहायक अधिक्षक (वर्ग 3) ग्रामीण रुग्णालय चिचगढ ता देवरी जि गोंदिया) असे लाचखोर अधीक्षकाचे नाव आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे निवृत्त कर्मचारी असून त्यांचे पेन्शन तसेच रजेच्या व इतर कामासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच रक्कमची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. प्राप्त तक्रारीवरून १३ सप्टेंबर २०२५ रोजी पडताळणी केली. लाचखोर सहाय्यक अधीक्षक मनोज बाबुलाल जांभुळकर यांनी १ लाख रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यावरून शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५‌ लाच रकमेची मागणी करून ग्रामीण रुग्णालय चिचगड येथील सेर्व्हन्ट क्वार्टर क्रमांक 2/8 येथे तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम स्वीकारली. फिर्यादीच्या तक्रारीवरून लाचखोर यांच्या विरुध्द पथकाने ग्रामीण रुग्णालयात सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली. एसीबीच्या पथकाने लाचखोर सहाय्यक अधीक्षक मनोज बाबुलाल जांभुळकर विरूध्द पोलीस स्टेशन चिचगड ता. देवरी जि. गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारित 2018) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अटक करून चिचगड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच लाचखोर कर्मचाऱ्याचा‌ मोबाईल ताब्यात घेऊन घराची झडती घेतली जात आहे. सदर कारवाई ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक शुभांगी वानखडे, पोलीस निरीक्षक वैशाली आठवले, पोलीस हवालदार अस्मिता मल्लेलवार, वंदना नागराळे, पोहवा अनिल बहिरे, नापोशी अमोल मेंगरे, चापोशी पो.अं./विजय सोळंके, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर आदींनी केली आहे.

blank