34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आठव्या पोषण आहार अभियानाचे के.टी.एस.येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

आठव्या पोषण आहार अभियानाचे के.टी.एस.येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

0
71

blank

दि.12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान राबविले जाणार अभियान

या वर्षीच्या पोषण माहची थीम स्वस्थ नारीसशक्त परिवार अभियान‘ असे आहे

गोंदिया,दि.२३- पोषण आहार अभियान ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहेजी मुलांमधील कुपोषण,कमी वजन आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी तसेच किशोरवयीन मुली,गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.तंत्रज्ञानाचा वापर करून आणि समुदायाच्या सहभागातून कुपोषणाचे समूळ उच्चाटन करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी प्रास्तविक प्रसंगी म्हटले आहे.

आठव्या पोषण आहार अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन दि.17 सप्टेंबर रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य के.टी.एस.रुग्णालयात संपन्न झाले.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,नागपूर विभागाचे नोडल अधिकारी डॉ.शाम निमगडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ.नितीन कापसे,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,अभियान नोडल अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे व डॉ.भाग्यश्री गावंडे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,आयईसी विभागाचे प्रशांत खरात व केटीएस रुग्णालयाचे डॉ.सुवर्णा हुबेकर उपस्थितीत होते.

के.टि.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया येथे शुभारंभ प्रसंगी पोषण आहार स्टॉल उभारण्यात आला होता.त्यावेळी आहार तज्ञ स्वाती चव्हाण, कोमल अवस्थी,अमिता पिल्लेवार यांचे सह स्टॉफ नर्स ज्योती उके,सारिका तोमर व भाग्यश्री वरवठे यांनी उपस्थितांना पोषण आहाराबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.

महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने अंगणवाड्यांमधून पोषण सहाय्यआरोग्य शिक्षण आणि बाल संगोपन सेवा दिल्या जातात. 0 ते वयोगटातील मुलेकिशोरवयीन मुलीगर्भवती महिलास्तनदा माता यांना विशेष आहार देवुन मातेला आरोग्य शिक्षण देवुन प्रशिक्षित केले जाते.महिलामुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये पोषणविषयक जागृतीला या अभियानातुन प्रोत्साहन करण्यात येत आहे.या आठव्या वर्षीच्या पोषण माहची थीम स्वस्थ नारीसशक्त परिवार अभियान‘ असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी यावेळी दिली आहे.

आठव्या पोषण आहार अभियानात खालील गोष्टीवर जनजागृती करण्यात येत आहे-

  • लठ्ठपणा दूर करणे-साखर आणि तेलाचा वापर कमी करण्याबाबत
    जागरूकता वाढवून आणि निरोगी सवयींना प्रोत्साहन देऊन कुपोषण आणि अतिपोषण या दोन्ही समस्यांवर मात करण्याचे उद्दिष्ट आहे.लठ्ठपणा ही एक सामाजिक समस्या आहे ज्यासाठी संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणारे सहाय्यक वातावरण आवश्यक आहे.
  • बालपण काळजी आणि शिक्षण – माता व बाल संपन कार्यक्रम अंतर्गत . 0 ते वयोगटातील मुलेकिशोरवयीन मुलीगर्भवती महिलास्तनदा माता यांना विशेष आहार देवुन मातेला आरोग्य शिक्षण देवुन प्रशिक्षित केले जाते .
  • एक पेड माँ के नाम- पर्यावरणीय शाश्वतता आणि पोषण जागरूकता एकत्रित करणे हे उद्दिष्ट आहे

blank