34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक S.S.जायस्वाल महाविद्यालयात JAM/GATE परीक्षा कार्यशाळेचे आयोजन

S.S.जायस्वाल महाविद्यालयात JAM/GATE परीक्षा कार्यशाळेचे आयोजन

0
51

blank

अर्जुनी मोरगाव,दि.२३– येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे आज २३ सप्टेंबर 2025 ला JAM 2026 संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आय़ोजन महविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनात राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ भारत राठोड यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते.
कार्यशाळेची माहिती प्रास्तविकात देतांना डॉ. चौधरी यांनी आपले महाविद्यालय जरी ग्रामीण भागात असले,तरी पण महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आजपावेतो JAM परीक्षा पास केली आहे. तसेच होतकरू आणि अभ्यासक विद्यार्थ्यांनी ग्रामीण व शहरी असा विचार मनात न आणता निरंतर अभ्यास केल्यास अश्या परीक्षेत यश प्राप्त करता येते असे सांगितले.
GATE – JAM OFFICE, IIT BOMBAY, POWAI, MUMBAI येथून मार्गदर्शना साठी आलेल्या Official Ambassador अनिर्निया बासू मॅडम यांनी विद्यार्थ्यांना JAM 2026 संदर्भात अनेकविध माहिती दिली. यात आवेदन फार्म भरण्या पासून तर विविध प्रकारच्या स्कॉलरशिप बाबतच्या माहितीचा समावेश आहे. Official Ambassador जेविथा बी . यांनी पीपीटीच्या साहाय्याने विशेषतः GATE परीक्षा संदर्भात माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी जाम आणि गेट परीक्षा संदर्भात अनेक प्रश्न विचारले. सर्व प्रश्नाचे समाधानकारक उत्तर या मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना दिले.महाविद्यलयातील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या अभ्यासक्रमातील 123 विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ऑनलाईन व ऑफलाईन साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमकरून JAM आणि GATE सारख्या परीक्षा पास करून नामांकित संस्थांमधून आपला उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या महाविद्यालयाचा नाव सतत उंचावत राहिले पाहिजे, असे मत अध्यक्षीय भाषणातून डॉ राठोड यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्याल्यातील मटेरियल सायन्स अशोसियेशनतर्फे करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ डी एल चौधरी यांनी केले.महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. अजय राऊत यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ नितीन विलायतकर, प्रा हेमंत परशुरामकर, डॉ आशिष कावळे, श्री बादल लाडे, शुभम शहारे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

blank