30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट

बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट

0
77

blank

चंद्रपूर : बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकार डाक विभागाने शुक्रवारी (दि. २६) चंद्रपुरात टपाल तिकिटाचे उत्साहात प्रकाशन झाले. डाक विभागातर्फे एस. रामाकृष्ण यांनी कर्तृत्वाचा सन्मान झाल्याची घोषणा केली. बॅरिस्टर राजाभाऊंनी वंचितांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी स्मरण केले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रवीण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष मारोतराव पत्रुजी खोब्रागडे तर मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अॅड. अभिजित वंजारी, देशक खोब्रागडे, किशोर सवाने आदी होते. आ. वडेट्टीवार म्हणाले, बॅरिस्टर साहेबांनी केवळ बौद्धांसाठी नाही तर ओबीसी, आदिवासींसाठी राज्यसभेत आवाज बुलंद केला होता. सर्वांनी मिळून लवकरच संविधान महोत्सव आयोजित करावे, असे आवाहनही त्यांनी आ. मुनगंटीवार म्हणाले, बॅरिस्टर राजाभाऊ फक्त दलित किंवा आंबेडकरी चळवळीचे नेते नव्हते. ते देशाचे नेते होते. राज्य शासनातर्फे सन्मान करण्यासाठी गौरवग्रंथ प्रकाशित करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. बॅरिस्टर साहेबांनी बाबासाहेबांच्या पश्चात देशातील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अनेक आंदोलने केली. उपेक्षित समाजाला न्याय मिळवून दिला, असे मत आमदार आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केले. आमदार अडबाले यांनीही बॅरिस्टर साहेबांचे विचार व कार्य युवा पिढीला दिशादर्शक असल्याचे म्हटले. बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या प्रयत्नाने नागपूरनंतर चंद्रपुरात धम्मदीक्षा सोहळा झाल्याचे आमदार अॅड. वंजारी यांनी सांगितले.

युगप्रवर्तक कार्याचा वारसा
महोत्सवाचे अध्यक्ष प्रवीण खोबरागडे यांनी आयोजनाची भूमिका मांडली. बॅरिस्टर खोबरागडे यांच्या युगप्रवर्तक कार्याचा वारसा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी भाषणातून व्यक्त केला. संचालन निवेदिता पुनवटकर यांनी केले. प्रतीक डोर्लीकर व अॅड. राजस खोबरागडे यांनी आभार मानले. आयोजनासाठी अशोक निमगडे, विशाल अलोणे, राजाभाऊ खोबरागडे, सत्यजित खोबरागडे, सुलभखोबरागडे, प्रेमदास बोरकर, शंकर वेल्हेकर, महादेव कांबळे, सुरेश नारनवरे, यशवंत मुंजमकर, दिलीप डांगे, कैलास शेंडे, मुन्ना खोब्रागडे, निर्मला नगराळे, गीता रामटेके, मृणाल कांबळे, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकर, वैशाली साठे, छाया थोरात, राजश्री शेंडे, अनिता जोगे, शीला कोवले, हर्षल खोबरागडे, प्रज्योत बोरकर, युगान डवले आदींनी सहकार्य केले.

blank