
*बायनरी कोड शिकविणारी जिल्ह्यातील पहिली* *शाळा*
खामगाव( गिरीश पळसोदकर) – तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, कदमापूर येथे शिकणारे चौथीतील विद्यार्थी एक विलक्षण कौशल्य आत्मसात करत आहेत. संगणकाच्या बायनरी भाषेचा गूढ कोड ते आपल्या बोटांवर मोजत शिकत असून, त्याचा वापर करून कोणताही कोड तयार करणे आता त्यांच्यासाठी अगदी सहजसोपे होत आहे.
२१ व्या शतकात जगण्यासाठी आवश्यक जीवनकौशल्ये, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार पद्धती विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्यात, त्यांचा तार्किक विकास व्हावा, या उद्देशाने शाळेचे शिक्षक राजेश कोगदे हा अनोखा उपक्रम राबवत आहेत. बायनरी कोड(द्विमान पद्धती )ही संगणकाची मूलभूत भाषा असल्याचे विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांनी ती गणिताशी जोडली. त्यातून बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया विद्यार्थ्यांना सहज व आनंददायी पद्धतीने करत आहेत.





