37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ राणी अवंतीबाई चौकात प्रवासी शेडचे लोकार्पण

राणी अवंतीबाई चौकात प्रवासी शेडचे लोकार्पण

0
71

blank

गोंदिया,दि.०१ः गणेशोत्सव मंडळ राणी अवंतीबाई मित्र परिवार यांच्या विशेष विनंतीवरुन स्थानिय आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला राणी अवंतीबाई चौकात बसस्थानक शेड तयार करण्यात आले.या बसस्थानक शेडचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.सदर परिसरात रुग्णालयासह शाळा व विविध खासगी प्रतिष्ठाने असल्याने नागरिकांना बस प्रवासी निवारा नसल्याने अनेकदा त्रास सहन करावा लागत असयाचा.मात्र चौकात आता बसस्थानक प्रवासी निवारा शेड तयार करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याने उमेश भांडारकर यांनी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले आहे.प्रवासी निवारा लोकार्पण वेळी माजी नगरपरिषद सभापती बंटी पंचबुद्धे,किरणकुमार अग्रवाल,दीपक बोबडे,गणेश चौधरी,संदीप कडूकर,वाहिद भाई,सुरेश शेंद्रे,मिताराम नेवारे,गुहेंद्र पारधी,कीर्ती पटले,गंगा मास्करे,छोटू गौतम,राहुल किलावत(वैष्णव),राजू फंडेे,सुनील रणदिवे,रवि सेंद्रे उपस्थित होते.

blank