
अर्जुनी मोरगाव,दि.०१– तालुक्यातील ताडगाव येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा परिसरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान होईल असे विचार आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे, सभापती महिला व बालकल्याण पौर्णिमाताई ढेंगे, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाणे, सडक अर्जुनी माजी उपसभापती शालिंदर कापगते, गट विकास अधिकारी पल्लवीताई धनविजे, पंचायत समिती सदस्य नाजूक कुंभरे, कृ.उ.बा.स. संचालक लोकपाल गहाणे, गजानन डोंगरवार, गणिताताई नाकाडे सरपंच ताडगाव, कुंदाताई डोंगरवार माजी सरपंच ताडगाव, कुटे जी विस्तार अधिकारी अर्जुनी मोर, कन्नाके विस्तार अधिकारी अर्जुनी मोर, गायकवाड, अमृत नाकाडे, कैलास कापगते, दशरथ शहारे उपसरपंच ताडगाव, कृष्णाजी खुणे सदस्य ताडगाव, हेमराजजी गणवीर, किरणताई नाकाडे, निर्मलाताई कुंभरे, फुलचंद मडावी, अभिजीतजी नाकाडे ग्रामपंचायत चे सदस्य आणि गावकरी मंडळी प्रामुख्यानं उपस्थित होते.





