33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ खोट्या कागदपत्रावर जमीन हडपण्याचा प्रयत्न-राहुलकर  कुटुंबीयांच्या आरोप

खोट्या कागदपत्रावर जमीन हडपण्याचा प्रयत्न-राहुलकर  कुटुंबीयांच्या आरोप

0
230

blank

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका
गोंदिया – खोट्या कागदपत्रांच्या आधारावर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा प्रकार फुलचूरटोला ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या सेलटॅक्स कॉलनी येथे घडला आहे. तशी माहिती मनोरमा राहुलकर यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत दिली.
मनोरमा राहुलकर म्हणाल्या की, माझ्या पतीच्या नावे आणि माझ्या ननंदच्या नावे  सेलटॅक्स कॉलनी येथे एक एकर जमीन भूमापन क्रमांक व उपविभाग 93/1 (क्षेत्र 0.40.00 आर) आहे. या जमिनीच्या सातबारावर आमच्या कुटुंबातील सहा लोकांची नावे आहेत. ज्यामध्ये आम्ही कोणताही फेरफार केलेला नाही. माझ्या मोठ्या मुलाचे निधन झाले. त्याची पत्नी मंगला राहुलकर हिने जून 2024 मध्ये माझी ननंद यांच्या नावाने खोटी नोटरी करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मंगला राहुलकर हिला तलाठी आणि मंडळ अधिकारी हे शह देत आहेत. त्यांच्याशी तिने साठगाठ करून जमीन हडपण्याच्या प्रयत्न चालविला आहे. तलाठी याने एका दिवसातच सातबारावर फेरफार करून मंगला राहुलकर यांना म्हटले की तुम्ही लवकरात लवकर ही जमीन विकून टाका नाहीतर तुमच्या घरचे लोक यावर आक्षेप उचलतील. तलाठी यांनी सातबारा वर फेरफार करताना आमच्याकडून कोणतीही विचारणा केली नाही असे मनोरमा राहूलकर यांनी सांगितले. तसेच तलाठी यांना विचारपूस केली असता तलाठी म्हणत आहेत की मला मंडळ अधिकारी यांनी जसे सांगितले तसे मी सातबारावर फेरफार केली आहे.

blank