37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नवीन इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे काम अधिक कार्यक्षमतेने होणार-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

नवीन इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे काम अधिक कार्यक्षमतेने होणार-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0
47

blank

अर्जुनी मोरगाव,दि.०८ः ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची केंद्रबिंदू संस्था असून तिच्या सशक्तीकरणासाठी अशा आधुनिक आणि सुसज्ज इमारतींचे बांधकाम अत्यंत आवश्यक आहे. या नवीन भवनामुळे गावातील प्रशासनिक कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडेल, तसेच ग्रामस्थांना सुलभ सेवा उपलब्ध होतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केला.ते दिनकरनगर ता. अर्जुनी मोरगाव येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमाला आम्रपाली डोंगरवार सभापती पंचायत समिती, संदीप कापगते उपसभापती पंचायत समिती, घनश्याम धामट पं. स. सदस्य, सुचित्रा शील सरपंच, पल्लवी वाडेकर गट विकास अधिकारी, सुबोध मजुमदार उपसरपंच, होमदास ब्राह्मणकर संचालक कृ. उ. बा. स, बनमाली मंडल पो. पा, प्रधान सरकार अध्यक्ष तंटामुक्त समिती,पाटणकरजी,सुनील सरदार माजी सरपंच, ए. सी. राणे विस्तार अधिकारी, एल. एन. कुटे विस्तार अधिकारी, खोकण सरकार, रॉयजी, ललिता मंडल, भानुमती सरकार, मीरा मंडल, रिंकू सरकार, पवन पवार व इतर मान्यवर आणि महिला व पुरुष मंडळी तसेच बालगोपाल उपस्थित होते.

blank