33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया ‘कुल’

विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया ‘कुल’

0
64

blank

गोंदिया-नोव्हेंबर महिन्यात वातावरणाने करवट बदलली असून अचानकच थंडीने एंट्रीने मारली. चांगल्या पावसानंतर चांगली थंडी पडते असे म्हटले जात असून त्याची प्रचिती येत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. दिवाळी आटोपूनही थंडीचे नामोनिशाण नसतानाच अचानकच थंडीने एंट्री मारली. मागील दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली व त्यातच रविवारी (दि.९) जिल्ह्याचे किमान तापमान ११.५ अंशांवर घसरले होते. घेण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी सोमवारीही (दि.१०) किमान तापमानात आणखी घसरण होऊन १०.४ अंशांवर आले होते. तर सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वांत थंड असल्याची नोंद घेण्यात आली. थंडीची चाहूल लागली असतानाच एकदम तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीचा आनंद जिल्हावासीय घेताना दिसत आहेत

blank