33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता १ कोटी रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत

१ कोटी रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत

0
58

blank

गडचिरोली- कुरखेडा तालुक्यातील एक शेतकरी गांजाची शेती करीत असल्याची माहिती मिळताच गडचिरोली येथील स्थानीक गुन्हे शाखेने १४ नोव्हेंबर रोजी धाड टाकुन तब्बल तब्बल १ कोटी १९ लाख ८३ हजार रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला. याप्रकरणी कृष्णा हरसिंगबोगा (४१) रा. हुलदंड याला अटक करण्यात आली आहे.गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेस हुलदंड येथे राहणारा इसम कृष्णा बोगा याने त्याचे राहते घराच्या सांदवाडीत अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा)ची लागवड केली असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे
शाखेच्या पोलीस पथकाने हुलदंड येथे धाड टाकुन बोगा याच्च्या घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घराच्या सांदवाडीत अंमली पदार्थ (गाजा) ची लागवड केलेली मिळून आली.पोलिसांनी घराच्या सांदवाडीत लागवड केलेला गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निळ्ळ गांजा २३९.६६ कि.ग्रॅ. वजन असलेला असा एकुण १ कोटी १९,८३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी कृष्णा हरसिंग बोगा याचे विरुध्द पुराडा पोलीस ठाण्यात दिनांक १४ नोव्हेंबर रोजी अप. क्र. १११/२०२५, कलम ८ (सी), २० (बी), २० (बी) (त्त्) (सी)गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाचा पुढीलतपास पोलीस मदत केंद्र मालेवाडाचे पोउपनि. आकाश नायकवाडी हे करीत आहे.

blank