
गोंदिया जिल्ह्यात २ नगरपरिषदा व २ नगरपंचायतीकरीता आज १३१ अर्ज दाखल
गोंंदिया,दि.१५ः गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगरपंचायतीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आज(दि.१५)चांगलीच गर्दी दिसून आली.गोंदिया नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाकरीता समत रामुजी मुरकुटे(शिवसेना),रुपाली यादोराव उके(काँग्रेस),माधुरी योगेश नासरे(ऱाष्ट्रवादी काँग्रेस) व अमित अर्जुनी बुध्दे(भाजप) जनार्दन मोहनजी बनकर(बहुजन समाज पार्टी) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची नावे जाहीर न झाल्याने जनतेत उत्कंठा दिसून येत आहे.
आज शनिवारला ४ स्थानिक स्वराज्य संस्थेकरीता नगरसेवकर पदाकरीता १२५ व नगराध्यक्ष पदाकरीता ६ अर्ज दाखल झाले.यामध्ये गोंदिया नगरपरिषदेकरीता अध्यक्षपदाकरीता ४ तर नगरसेवकपदाकरीता ८६,तिरोडा नगरपरिषद नगरसेवक पदाकरीता २०,सालेकसा नगरपंचायत नगरसेवक पदाकरीता ५ व गोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकरीता २ व नगरसेवक पदाकरीता १४ अर्ज दाखल झाले आहेत.यापुर्वी नगराध्यक्ष पदाकरीता १ व सदस्यपदाकरीता ५४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.गोंदियातील प्रभाग क्रं.४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज शुक्ला व सौ.धनिषा संजय कटरे,प्रभाग क्रं.११ मधून भाजपचे अहमद मनियार,प्रभाग क्र.२१ अनुसूचित जाति महिला राखीव गटातुन सौ. प्रीति राहुल वालदे,प्रभाग क्रं.१२ ओबीसी गटातून भाजपकडून प्रीतीश(छोटु)रामटेककर यांच्यासह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.





