39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ बालविवाहमुक्त भारत जनजागृती सप्ताह;दामिनी पथकाचा पुढाकार : ‘बॅड टच-गुड टच’चे दिले धडे

बालविवाहमुक्त भारत जनजागृती सप्ताह;दामिनी पथकाचा पुढाकार : ‘बॅड टच-गुड टच’चे दिले धडे

0
28

गोंदिया : पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक शेवते, दामिनी पथकचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनीषा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत दामिनी पथकाने १४ नोव्हेंबर रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा खलबंदा येथे बालविवाहमुक्त भारत जनजागृती सप्ताह अभियान राबविण्यात आले.
यावेळी दामिनी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, शिपाई प्रशांत बनसोड, मपोशि वैशाली भांदक्कर, सोनाली, चालक सुवर्णा मडावी तसेच इंडियन वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष पटले, इतर सदस्य, बाल संरक्षण अधिकारी गजनान गोबाडे उपस्थित होते. बालविवाहमुक्त भारत व १४ ते २० नोव्हेंबर बालहक्क सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांना पोक्सो अॅक्ट, बॅड टच व गुड टच, सायबर क्राईम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ तसेच विद्यार्थांना लैंगिक छळवणूक आदींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बाल विवाह कायदा २००६ नुसार बालविवाह केल्यास होणारी शिक्षा व बालविवाहाचे मुलीवर होणारे दुष्परिणाम याबाबत समजावून सांगितले. तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांसह बालविवाह प्रतिबंधाबाबत गावात काढलेल्या जनजागृती रॅलीत सहभाग घेतला.