37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा हवालदार अमृत खेडकर यांचा कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास!

हवालदार अमृत खेडकर यांचा कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास!

0
26

blank

सोलापूर : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने तसेच फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कश्मीर ते कन्याकुमारी ही 4250 किमी अंतराची भव्य सायकल रॅली दिनांक 1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडली.
या अत्यंत आव्हानात्मक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या रॅलीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पो. हे. कॉ. अमृत रोहिदास खेडकर यांनी दमदार वेग, जिद्द आणि चिकाटी दाखवत फक्त 16 दिवसांत 4250 किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. सदर स्पर्धेमध्ये देशभरातून 150 स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी केवळ 107 स्पर्धकांनी हा अत्यंत कठीण प्रवास पूर्ण केला.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातून ही रॅली पूर्ण करणारे पहिले पोलीस कर्मचारी होण्याचा मान हवालदार अमृत खेडकर यांना प्राप्त झाला असून, ही संपूर्ण पोलीस दलासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.या विलक्षण कामगिरीसाठी बार्शी सायकलिंग क्लब आणि बार्शी रनिंग क्लब यांनी दिलेले मार्गदर्शन व सहकार्य देखील मोलाचे ठरले आहे.
या प्रवासातून त्यांनी उत्कृष्ट शारीरिक क्षमता, शिस्त, जिद्द आणि चिकाटीचे विलक्षण प्रदर्शन घडविले. यापूर्वीही त्यांनी गोवा येथील आंतरराष्ट्रीय Ironman स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून आपली क्षमता सिद्ध केली आहे.त्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, माढा पोलीस स्टेशनचे प्रभारी नेताजी बंडगर, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.अमृत खेडकर यांच्या या कामगिरीमुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दल तसेच संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, युवकांसाठी प्रेरणादायी असा हा उपक्रम ठरला आहे.

blank