
गोंदिया-गोरेगाव नगर पंचायत निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक भान असलेले पत्रकार हिदायत शेख यांना रिंगणात उतरवले आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात हाॅकर म्हणून सुरु झालेला तीन दशकातील पत्रकारितेचा अनुभव नागरिकांच्या न्यायासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्याची हिम्मत ही त्यांच्या ओळखीची मजबुती आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारा, सहज उपलब्ध आणि प्रामाणिक उमेदवार म्हणून हिदायत शेख आज व्यापक चर्चेत आहेत.
हिदायत शेख यांचा प्रवास अत्यंत साधेपणातून सुरू झाला. बालपणापासूनच संघर्ष त्यांच्या आयुष्यात साथ देत होता. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी हॉकर म्हणून वृत्तपत्र विक्रीचे काम सुरू कैले. याच माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या, त्यांची वेदना, समाजातील अन्याय, प्रशासनातील त्रुटी जवळून पाहिल्या. त्यांना जाणवले- “जर काहीतरी बदल घडवायचे असेल तर लोकांचा आवाज बुलंद करणे गरजेचे आहे.”
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान टिकून राहावा यासाठी त्यांनी अनेक वेळा ठाम भूमिका घेतल्या.
जिथे अन्याय दिसला तिथे हिदायत शेख कधीच शांत बसले नाहीत. त्यांचा विश्वास असा कि “सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी, दडपशाहीसाठी नव्हे.”पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही हिदायत शेख यांचे योगदान महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण मोहिमा, स्वच्छता अभियान, लोकजागृती उपक्रम, पर्यावरण संरक्षण, सामाजिक प्रश्नांवरील मोहीम, जनजागृती
रॅली, शालेय आणि स्थानिक संस्थांबरोबर उपक्रम, त्यांचे काम केवळ कॅमेऱ्यासाठी नसून प्रत्यक्ष जमिनीवर लोकांमध्ये मिसळून करण्याची त्यांची शैली आहे.
घेऊन सोडवण्यासाठी अधिकृत भूमिकेत असणे गरजेचे आहे.” आणि याच भावनेतून त्यांनी प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. हे निर्णय घेताना त्यांच्या मनात एकच ध्येय होते, प्रभागाचा विकास, नागरिकांचा स्वाभिमान आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना अधिकृत उमेदवारी दिली.





