
ब्रम्हपुरी,दि.२६ः येथील प्रतिष्ठित नागरिक,काँग्रेसचे तसेच ओबीसी संघटनेचे जेष्ठ नेते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. गोविंदराव बाबुरावजी भेंडारकर यांचें मंगळवार दिनांक २५/११/२०२५ रोजी रात्री ठिक ९.३० वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षात शोककळा पसरली आहे.मनमिळावू स्वभावाचे गोविंदराव हे सर्वांचेच चाहते होते.त्यांच्या निधनाने काँग्रेसला अपरिमित हानी झाल्याचे आमदार विजय वड्डेटीवार यांनी शोकसंवेदनेत म्हटले आहे.





