
सडक अर्जुनी,दि.०३ः जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा जांभळी दोडके येथे दिव्यांग दिनी शालेय विद्यार्थी यांनी दिंडी काढून व हातात पोस्टर्स घेवून कार्यक्रमाची सुरुवात करून विशेष प्रार्थनेने व दिव्यांग सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शनाने करण्यात आली.
सदर कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, बी.आर बागडे, धम्मदीप साखरे, जितेंद्र कवरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.शाळेचे मुख्याध्यापक किशोर डोंगरवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “दिव्यांगता ही मर्यादा नसून क्षमतांची नव्या दृष्टिकोनातून ओळख आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात एक विशेष चमक असते, आणि शाळेचे काम त्या क्षमतेला योग्य दिशा देणे आहे.”
या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. जागरूकता वाढवण्यासाठी पोस्टर प्रदर्शन, संवेदना उपक्रम आणि विशेष भाषण यांचाही समावेश करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.श्यामा कुंडगिर यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. माया तांदळे यांनी मानले.





