* परीक्षा केंद्राचे 200 मीटर परिसर प्रतिबंधित
गोंदिया, दि.9 : जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा-2026 नवेगावबांध मार्फत इयत्ता 6 वी साठी प्रवेश परीक्षा दि.13 डिसेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 41 परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने दि. 13 डिसेंबर 2025 रोजी भारतीय नागरीक सुरक्षा संहिताचे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील सदर परीक्षेसाठी नियुक्त परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर परीक्षे दरम्यान कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅल्क्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध केले आहे.
सदर आदेश दि.13 डिसेंबर 2025 रोजी परीक्षेच्या कामावर नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशास लागू राहणार नाही. हा आदेश दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.





