33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता यवतमाळचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर १ लाखाची लाच घेतांना जाळ्यात

यवतमाळचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर १ लाखाची लाच घेतांना जाळ्यात

0
133

blank

यवतमाळ,दि.१२ः शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील वर्ग १ चे पोलीस निरीक्षक असलेले नरेश रणधीर यांना अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याच दालनात १ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडल्याने यवतमाळ जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने गुरुवार दि.११/१२/२०२५ रोजी तक्रार दिली की, त्यांचे एका मित्राला पैश्याची गरज असल्याने त्यांनी मध्यस्थी करुन त्यांचे दुसरे मित्राकडून १०,००,००० रुपये घेवून ६ महिन्याकरीता त्यांना दिले.परंतु ज्या मित्राला पैसे दिले त्याने सहा महिने पुर्ण होवूनही घेतलेले पैसे अदयाप पावेतो परत दिलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.१०/१२/२०२५ रोजी ज्या मित्राला पैसे दिले तो परत करत नसल्याबाबतची तक्रार पो.स्टे.अवधुतवाडी, यवतमाळ येथे दिली असता,पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी तक्रारदारास त्यांचे पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात ५,००,००० रुपये लाचेची मागणी केली.त्या अनुषंगाने तक्रारदाराने अमरावती एसीबीकडे लेखी तक्रार दिली.त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज शुक्रवार दि.१२/१२/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सत्यता पडताळणी दरम्यान पोलीस निरीक्षक रणधीर यांनी तक्रारदार यांचेकडे ३,००,००० लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेच सापळा कारवाई दरम्यान ठाणेदार नरेश रणधीर, यांने तक्रारदारकडून मागणी केलेल्या लाच रक्कम पैकी १,००,००० रुपये लाच म्हणून स्विकारल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.विशेष ते ज्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक आहेत,त्याच शहरातील अवधुतवाडी, पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

सदरची कारवाई एसीबीचे अमरावती परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक बापू बांगर, यांचे मार्गदर्शना खाली पो.नि.चित्रा मेसरे, पो.नि.स्वप्निल निराळे, पो.शि.शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, चालक स.पो.उ. नि.सतीश किटूकले, चालक पो.कॉ. राजेश बहिराट यांनी यशस्वीरित्या पार पाडली.