
गोरेगाव — महिला व बालविकास विभागातर्फे सखी अभियानांतर्गत महिला अत्याचार रोखण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन येथील पी.डी.रहागंडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले होत. या कार्यक्रमात महिलांवरील कौटुंबिक हिंसा, लैंगिक छळ, मानसिक व शारीरिक अत्याचार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
मार्गदर्शकांनी महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती दिली. महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, 181 महिला हेल्पलाईन, पोलीस मदत, तसेच समुपदेशन व संरक्षण सेवा याबाबत वर्ग 9ते12 च्या विद्यार्थिनींना रवी अंबुले तालुका संरक्षण अधिकारी,माधुरीताई बिसेन समुपदेशक वन स्टाप सेंटर महिला व बालकल्याण विकास गोंदिया ,ए डी बिसेन सहाय्यक संरक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच.कटरे,सी.आर.बिसेन,डी.एम.राठोड,ए.जे.सोरले,जे.वाय.बिसेन,के.आय.कटरे उपस्थित होते. प्राचार्य यांनी मार्गदर्शन करतानी विद्यार्थिनींना अत्याचार सहन न करता योग्य वेळी तक्रार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींना सुरक्षिततेसाठी आत्मविश्वास, स्वसंरक्षण, आणि समाजातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित विद्यार्थिनींनी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेतला.या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढून महिला अत्याचाराविरोधात जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे संचालन सी.आर.बिसेन यांनी तर आभार डी.एम.राठोड यांनी मानले.





