
अर्जुनी-मोर.– तालुक्यातील गौरनगर येथे १५ वा वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत गौरनगर यांच्या वतीने प्रस्तावित वसाहतीच्या विस्तारीत गटार बांधकामाच्या कामाचा भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या विकासकामाचे भूमिपूजन सौ. जयश्रीताई देशमुख सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नाजुक कुंभरे सदस्य पंचायत समिती अर्जुनी-मोर, विकास वैद्य सरपंच तसेच देवव्रत वैद्य उपसरपंच,हरिदास सरकार,माधव गाईन,नारायण सरकार,लतिका सरकार,सुभाष राॅय,गणेश सरकार,ग्रामपंचायत अधिकारी पारधी ,कंत्राटदार नितीन नाकाडे,व राहुल कोवे, रवि पर्वते,अनुप पुस्तोळे, यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरनगर येथील वसाहतीत पावसाळ्यात साचणारे सांडपाणी व निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेची समस्या दूर होणार असून, या गटार बांधकामामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.भूमिपूजनप्रसंगी बोलताना जयश्रीताई देशमुख यांनी सांगितले की, “ग्रामविकासासाठी मूलभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक असून, स्वच्छता व आरोग्याशी संबंधित कामांना प्राधान्य दिले जात आहे. गौनगरच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.”कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत गौरनगरचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. विकासकामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





