34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा रेहळी शाळेची अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यशस्वी कामगिरी

रेहळी शाळेची अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यशस्वी कामगिरी

0
35

blank

देवरी : तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या रेहळी गावाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्तम प्रदर्शन करत एकूण १५ पारितोषिके पटकावली.

पिंडकेपार येथे आयोजित अटल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली क्रीडा साधने, टी-शर्ट किट, लेझीम, मुखवटे व इतर साहित्य रेहळी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून लोकवर्गणीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. शाळा व्यवस्थापन समितीकडून प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांना तर शितला माता क्रीडा मंडळ, रेहळी यांच्याकडून माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांना टी-शर्ट किट देण्यात आले. तसेच गावातील बचत गटातील महिलांनी लेझीम सादरीकरणातील मुलींसाठी २० साड्या खरेदी करून दिल्या.

देवरी पंचायत समिती अंतर्गत आलेवाडा केंद्राचा केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव १४, १५ व १६ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, पिंडकेपार येथील क्रीडांगणावर पार पडला. कबड्डी या क्रीडा प्रकारात गावाचे विशेष प्रेम असून “कबड्डी स्पर्धेत उच्च प्राथमिक गटातील मुले व मुली या दोन्ही संघांनी निर्विवाद विजय मिळवत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला.”

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तुषार पुरुषोत्तम लंजे, सहशिक्षक राहुल हेमराज कापगते, स्वयंसेवक दुर्वेश कुंजाम, रामकृष्ण मडावी, कु. रजनी मडावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सोनमताई नेताम, उपाध्यक्ष शिवपाल नेताम, तसेच कन्हैया सयाम,राधेलाल सोरी आणि समस्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

blank