34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ प्रियंकांच्या खांद्याला खांदा लावून यवतमाळचा विकास करणार – माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी

प्रियंकांच्या खांद्याला खांदा लावून यवतमाळचा विकास करणार – माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी

0
39

blank

यवतमाळ:यवतमाळ शहरातील सकल माळी समाजाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. प्रियंका जितेंद्र मोघे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या पाठिंब्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे.
काल (१२ डिसेंबर) रोजी शहरातील उत्सव मंगल कार्यालयामध्ये माळी समाजाची महत्त्वपूर्ण सहविचार सभा पार पडली. या बैठकीत सर्व समाजाने एकमुखाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसेच, या निवडणुकीमध्ये सर्व ताकतीनिशी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आश्वासनही दिले.
याप्रसंगी माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “मी प्रियंका मोघे यांच्या खांद्याला खांदा लावून यवतमाळ शहराच्या विकासासाठी अविरत झटणार आहे. मी आता यवतमाळ शहराचीच रहिवासी असून शहराच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणार आहे.”
त्यांनी पुढे भर दिला की, “माझ्यात आणि प्रियंकामध्ये कुठलाही भेदभाव न करता, प्रियंका म्हणजेच माधुरी मडावी असे समजून या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी विजयी करा आणि यवतमाळला त्याचे गत वैभव प्राप्त करून द्या.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर गोरे साहेब होते. तसेच,माणिकराव ठाकरे साहेब (विधानपरिषद माजी उपसभापती)अँड. शिवाजीराव मोघे साहेब (माजी मंत्री),प्रा. वसंतराव पुरके सर (माजी शिक्षण मंत्री)बाळासाहेब मांगुळकर (यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार),अँड. प्रफुल मानकर (यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष)प्रदीपभाऊ वादाफळे, माधुरीताई मडावी (माजी मुख्याधिकारी यवतमाळ),सविताताई हजारे,संतोषभाऊ बोरले, संजयभाऊ ठाकरे, उत्तमराव खंदारे, सविता कावलकर, प्रा. संजय वानखेडे, अशोक तिखे, सुबोध होले, विनोद इंगळे, गजानन वाघ, निशिकांत धेडे, अशोक मोरे, प्रशांत कुबडे, विशाखा येवतकर आदी उपस्थित होते.
या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि प्रा. वसंतराव पुरके सर यांचीही प्रभावी भाषणे झाली. त्यांनीही माळी समाजाच्या पाठिंब्याचे स्वागत केले आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक वाघ यांनी केले.माळी समाजाच्या या पाठिंब्यामुळे काँग्रेस उमेदवारांच्या विजयाच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या आहेत.

blank