
निरोगी व्यक्तींशी लग्न केल्यास सिकलसेल पिढीला लागणार “ब्रेक“ -डॉ.सुरेंद्र खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी,आयुर्वेदीक दवाखाना बोंडगावदेवी
गोंदिया,(दि.22 डिसेंबर)- सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह दि.11 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील विविध शाळा,महाविद्यालयात रक्त तपासणी व समुपदेशन शिबीरे आयोजित करण्यात येत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी अंतर्गत बोंडगावदेवी येथील आश्रमशाळेत सिकलसेल सप्ताह निमित्त रक्त तपासणी व समुपदेशन शिबीरे आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची सिकलसेल संबधाने रक्त तपासणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन कुलसुंगे यांनी यावेळी सिकलसेल आजार हा रक्तातील पेशींचा आकार बदलणारा एक गंभीर अनुवांशिक आजार आहे.हा विकार सामान्यतः लाल रक्तपेशींच्या आकारावर आणि कार्यावर परिणाम करतो.ही एक गंभीर समस्या आहे, हा अनुवांशिक जेनेटिक विकार हिमोग्लोबिन जीनमधील उत्परिवर्तनामुळे होतो.लाल रक्तपेशी आपला नेहमीचा आकार सोडून ‘सिकल‘ म्हणजेच कोयत्यासारखा आकार धारण करतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.या आजाराची अनेक लक्षणे दिसून येतात, ज्यांचा व्यक्तीच्या जीवन गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
बोंड्गावदेवी आयुर्वेदीक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेंद्र खोब्रागडे यांनी या वेळी ऍनिमिया, कावीळ आणि यकृत व प्लीहा यांचा आकार रुंदावणे ही काही सर्वसामान्य लक्षणे आहेत.त्याबरोबरीनेच गंभीर वेदना, अवयवाचे नुकसान होणे, संसर्गाचा धोका वाढणे आणि शरीर कमजोर करणारी ऑर्थोपेडिक स्थिती अशी देखील लक्षणे दिसून येतात. सिकल सेल ऍनिमिया ही भारतातील लाखो लोकांना भेडसावत असलेली एक गंभीर आरोग्य समस्या आहे आणि तरी देखील या अनुवांशिक रक्त विकाराकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. रक्ताशी संबंधित गंभीर आजार ‘सिकल सेल‘, म्हणून सिकलसेल व्यक्तींनी वाहक किवा ग्रस्त व्यक्तींशी आपसी लग्न टाळणे गरजेचे आहे.सिकलसेल रोगी व्यक्तींनी निरोगी व्यक्तींशी लग्न केल्यास सिकलसेल पिढीला “ब्रेक“
लागणार असुन हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले.
सिकलसेल रक्त तपासणी व समुपदेशन शिबीरे यशस्वी करण्यासाठी डॉ.कुंदन कुलसंगे, डॉ.सुरेंद्र खोब्रागडे, आरोग्य सेवक पवन साखरे,आरोग्य सेविका स्वाती लोहारे,आशा सेविका वर्षा रामटेके व सारिका रंगारी,वाहन चालक घनश्याम उरकुडे,परिचर रेखा शिखरामे यांचे सह शिक्षकवृंद कीर्ती जोडे, ए.बी.रामटेके,के.एफ.गोंडाने,सा





