34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक मुख्याध्यापक संघाच्या विदर्भ कार्यकारीणीत हुकरे,गिर्हेपुंजे,बहेकार व रजिया बेग यांचा समावेश

मुख्याध्यापक संघाच्या विदर्भ कार्यकारीणीत हुकरे,गिर्हेपुंजे,बहेकार व रजिया बेग यांचा समावेश

0
37

blank

चित्रा कापसे/तिरोडा,दि.२६ः-अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी,राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.एस.ढोमसे,माजी राज्य अध्यक्ष वसंतराव पाटील, माजी अध्यक्ष व मार्गदर्शक मारोती खेडेकर ,उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, विदर्भ अध्यक्ष सतिश जगताप सचिव विलास भारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ मुख्याध्यापक संघाची कार्यकारणीची निवड करण्यात आली .

त्यात गोंदिया जिल्ह्यातील उपाध्यक्षपदावर धनराज हुकरे, संघटन सचिव डी.आर.गिरीपुंजे ,संघटक रजिया बेग, जिल्हा प्रतिनिधी दिनेश बहेकार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.ही सभा नागपूर येथील कमला नेहरू महाविद्यालयात घेण्यात आली.याप्रसंगी राज्यातील व विदर्भातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या व त्यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन नागपूर जिल्हाध्यक्ष विलीन आरघोडे तर आभार प्रदर्शन राम बाणते यांनी केले. निवड झालेल्या कार्यकारिणीचे सर्व मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

blank