
गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2025-26 मधील धान खरेदीकरीता शेतकरी नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु सदर कालावधीत धान खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी पुरेशी न झाल्यामुळे शासनाकडून दि.31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
तरी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान विक्रीकरीता नजिकच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर जाऊन दि.31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी करावी. शासनाच्या या धान खरेदी योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.





