42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक देवरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

देवरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

0
75

blank

देवरी,दि.०४- स्थानिक जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा देवरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती काल शनिवारी (दि.०३) उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जवाहरलाल घासले हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष कल्पनाताई हुळे, व्यवस्थापन समिती सदस्या माधुरी मांदाडे,शामिना मांदाडे,संगीताताई निकोडे,गुणाताई मांदाडे, नीताताई वाडगुरे, अश्विनीताई चाटारे,सुनीताताई उके, गोविंदजी मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालक गटातून सुनिता राऊत, इंदिरा शेंडे, सुषमा पेटकुले,रेखा नाईक, सुनिता राजपूत, पुरुषोत्तम मानकर,रेहान खान,कुरसुंगे उपस्थित होते.
याप्रसंगी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांच्या गीत गायन, नृत्य व भाषणांनी कार्यक्रमाला रंगत आली.
मंचावर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर,प. शिक्षिका कु. शिवणकर मॅडम, सहा.शिक्षक श्री.मुनेश्वर टेंभुर्णे सर, शिक्षिका कु. पुराम मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. टेंभुर्णे सर यांनी तर आभार प्रदर्शन कु.शिवणकर मॅडम यांनी केले.

blank