
विजेत्यांचा झाला सन्मान :कबड्डी, खो-खो, सामने रंगले
मोहाडी -तालुक्यातील जांब केंद्राआंतर्गत शालेय क्रीडा सांस्कृतिक महोत्सव जि.प. शाळा सालई खुर्द येथे पार पडला. या त्रिदिवसीय महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रेक्षणीय कवायत आणि मैदानी खेळ, जसे की, कबड्डी, खो-खो, घेण्यात आले. केंद्र प्रमुख नरेंद्र उरकुडे स्वतः उपस्थित राहून सर्व नियोजन केले आणि तीनही दिवस उपस्थित राहून क्रीडा सत्र अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडले.
समारोप कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरकस्थानी माजी आमदार चरण वाघमारे, तर अध्यक्षस्थानी सरपंचा अनिता पटले हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता अमित मेश्राम, उपसरपंच लक्ष्मीकांत सव्वालाखे, अध्यक्ष लालचंद ठाकरे, उपाध्यक्ष ज्योती मांढरे, शिक्षक ज्ञानेश्वर दमाहे,माजी मुख्याध्यापक गुलाब आव्हाड,
ग्रा.प.सदस्य शिवदास पटले, नंदलाल लिल्हारे, एमरीत ठाकरे, सुनील ठाकरे, गोपाल लिल्हारे, ढेकल ठाकरे, प्यारेलाल दमाहे, विलास ठाकरे, नितीन लिल्हारे, विजय पटले, ज्योती अठराहे, भाग्यश्री कोहरे, कंचना ठाकरे, तेजेश्वरी पटले प्रभा वरठे, अलिशा वाघमारे, दुर्गा चवरे, शामकला मांढरे, सुनिता राणे, सुरेखा दमाहे, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल, सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. कार्यक्रमाच्या यशासाठी शाळा समिती, ग्रामपंचायत, शिक्षक वगावकऱ्यांचे यांनी योगदान दिले. क्रीडा महोत्सवाचे संचालन केंद्र प्रमुख नरेंद्र उरकुडे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक भुरे यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शाळेतीलमुख्याध्यापक वाय.जी. भुरे, दिनेश चिंधालोरे, एम.एन. सहारे. अवंतिका शर्मा, व्ही.एस. बोंदरे, गजानन बावणे, दिनेश गायधने, कुमारी स्वाती होळंबे, उमेशजी सिंगनजुडे, सुनिलजी लांबकाने, मनोज सव्वालाखे, सर्वश्री पंचकमेटी, शिक्षक कर्मचारी, यांच्यासह शालेय विद्यार्थी व नागरिक यांचा सुद्दा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
यावर्षी शालेय क्रीडा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करताना अनेक अडचणी आल्या. परंतु या अडचणींवर मात करून केंद्र प्रमुख नरेंद्र उरकुडे, मुख्याध्यापक भुरे,मुख्यधापक वा.जी.भुरे, शिक्षक व्ही. बी. ठवकर, डी.एस.हाके, युनूस कुरेशी, शिक्षिका एस.ए.गोंडाने, एस.एस.अडसूळ, एस.जी.आव्हाड, बबिता लिल्हारे, राकेश मेश्राम,शाळा समिती, ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. केंद्र स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक सत्र अत्यंत यशस्वीपणे व नियोजनबद्ध राबविण्यात यश आले. तीन्ही दिवस गावकऱ्यांकडून गोड जेवण ठेवण्यात आला.





