35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ नगरपंचायत उपाध्यक्षपदी मलेशाम येरोला यांची निवड

नगरपंचायत उपाध्यक्षपदी मलेशाम येरोला यांची निवड

0
108

blank

गोरेगाव, ता. 10 : येथील नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून तेजराम बिसेन यांची निवड झाली. दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता.९) नगरपंचायत सभागृहात निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उपाध्यक्ष म्हणून मलेशाम येरोला यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अक्षय परदेशी होते. नवनिर्वाचित नगरसेवकांची नगरपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली. यात उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थनात साहेबराव भैरम व काँग्रेसचे मलेशाम येरोला यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय परदेशी यांनी गुप्त मतदान किंवा हात उंचावून मतदान करावे, असा प्रस्ताव सदस्यांसमोर ठेवला असता हात उंचावून मतदान करण्यात आले. यात भाजप-राष्ट्रवादी समर्थित साहेबराव भैरम यांना ७ मते मिळाली व काँग्रेसचे मलेशाम येरोला यांना ११ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

blank