34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक एकल अभियान द्वारे संचस्तरीये वार्षिक उत्सव संमेलन

एकल अभियान द्वारे संचस्तरीये वार्षिक उत्सव संमेलन

0
62

blank

गोरेगांव,दि.१२ः एकल अभियान द्वारे वार्षिक उत्सव संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम श्रीहरी सत्संग भजन मंडळ स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील पठाणटोला ग्रामपंचायत निंबा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम पंचायत निंबाचे सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या शुभहस्ते पार पडले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.डी. जगनित हे होते.या कार्यक्रमांमध्ये तिगाव संच अंतर्गत एकूण एकल अभियानाचे 30 विद्यालय कार्यरत आहेत.त्यामध्ये आमगाव तालुक्यातील 17 व गोरेगाव तालुक्यातील 13 विद्यालयाच्या समावेश आहे .यामध्ये तिगाव संचामधील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील अध्यात्म व संस्काराला वाव व प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीकोणातून भजन मंडळाच्या स्पर्धेचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते.सरपंच वर्षा विजय पटले यांनी एकल अभियानचि सविस्तर माहिती देताना सांगितले की, या एकल अभियानाची सुरुवात 1989 मध्ये झारखंड या राज्यात 60 एकल विद्यालय एक शिक्षक शाळा या धर्तीवर सुरू झाले.परंतु आज रोजी संपूर्ण भारतात एक लाखाच्या वर विद्यालय कार्यरत आहेत. भारतातील ग्रामीण भागात आदिवासी व दुर्गम भागातील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळणे हे मुख्य उद्देश्य होते. कारण अनेक ठिकाणी सरकारी शाळाच उपलब्ध नसल्यामुळे या अभियानाची गरज होती .
एकल अभियान म्हणजे हे ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील मुलांसाठी चालवले जाणारे “एक शिक्षक” एक गाव” एक शाळा” या संकल्पनेवर आधारित शैक्षणिक सामाजिक कार्य आहे.
आपण यापूर्वीच्या जर विचार केला तर त्याकाळी शिक्षणाचा अभाव दुर्गम जंगल भागात शाळाच नव्हत्या मुलांना शाळेसाठी पाच ते दहा किलोमीटर पायी चालत जावे लागत होते, त्यामुळे मुले मुली शाळा शिकत नव्हत्या. आदिवासी व गरीब मुलांचे दुर्लक्ष सरकारी योजनांचा लाभ मिळत नव्हता व साक्षरतेच्या प्रमाण कमी म्हणजे फारच कमी होता. समाजाच्या सर्वांगीण विकास केवळ अक्षर ओळख नव्हे तर संस्कार ,स्वच्छता, आरोग्य, स्वावलंबन, व्यसनमुक्ती ,याची गरज लक्षात घेऊन कमी खर्चात गावातच लोकसभागातूनच शिक्षण देण्याची एकल विद्यालय संकल्पना सुरू करण्यात आली. ही विद्यालय चालवत असताना गावातीलच एक स्थानिक शिक्षक त्याला आपण आचार्य असे म्हणतो. ते दररोज साधारणता दोन ते तीन तास वर्ग मंदिरात ,अंगणवाडी ,समाज मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी पाच ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवत असतात.
गोंदिया जिल्ह्यात 2008 पासून या एकलवयांची सुरुवात झाली पहिल्यांदा साले कसा तालुक्यामध्ये 2011 मध्ये तालुका देवरी मध्ये सुरुवात करण्यात आली.
2019 मध्ये सडक अर्जुनी येथे तीन संच 90 विद्यालय सुरू करण्यात आले .तसेच तिगाव संच हा 2019 मध्ये सुरू करण्यात आले. त्याला तिगांव संच असे नाव देण्यात आले. त्यामध्ये गोरेगाव तालुक्यातील निंबा, पठाणटोला, पिपरटोला, हलबिटोला , तेढा महाजनटोला,ताणूटोला, गौरीटोला, खोसेटोला, हिराटोला ,गोवारीटोला, चोपा चांगोटोला,उर्वरित 17 गावे आमगाव तालुक्यातील आहेत. आपल्या जिल्ह्यात एकूण दहा संच आहेत एका एक संच म्हणजे 30 विद्यालय म्हणजेच 300 विद्यालय आज रोजी कार्यरत आहेत. प्रत्येक गावात आठ प्रकारचे समिती आहेत, प्रत्येक समितीमध्ये सात सदस्य असतात .त्यामध्ये प्रामुख्याने ग्राम समिती, आरोग्य समिती, शिक्षण समिती, महिला समिती, जागरण समिती, ग्राम विकास समिती ,संस्कार समिती ,अशा प्रकारच्या इतर विद्यालयाची स्थापना आहे. तसेच माझ्याकडे तिगाव संच प्रभारी म्हणून जबाबदारी आहे असे सुद्धा यावेळी वर्षा पटले यांनी सांगितले .तसेच नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित, मा. जि प .सदस्य ज्योतीताई वालदे, तेढा येथील सरपंच भूमेश्वरी औरासे, सेवा सहकारी उपाध्यक्ष सुरेंद्र राहगडाले, उपसरपंच नंदलाल उईके, पुष्पाताई पटले , पुष्पा भांडारकर, मालता भगत, विजय पटले, व्यास कथाकर भैय्यालाल पटले महाराज, तानेश्वर कटरे ,देवकरण कटरे, रमेश तुरकर ,30 विद्यालयातील आचार्य ,विद्यार्थी भजन स्पर्धेला आलेले भजन मंडळी , हरिभक्त परायण महाराज मंडळी,व गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन पुरुषोत्तम ब्राह्मणकर यांनी केले ,तर आभार आचार्य मीनाक्षी चव्हाण यांनी मांनले

blank