43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास स्नेहसंमेलनातून होतो-आमदार विजय रहांगडाले

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास स्नेहसंमेलनातून होतो-आमदार विजय रहांगडाले

0
23

blank

तिरोडा-विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून होतो आणि ते ठिकाण म्हणजे शाळा हीच असते नुसतं अभ्यासाने विद्यार्थी एकांगी बनतात तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ गीत गायन म्हणजेच स्नेहसंमेलन होणे गरजेचे आहे .असे आमदार विजय रहांगडाले यांनी भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलून दाखवले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांचे हस्ते, प्रतिभा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्ही बी चौधरी यांचे अध्यक्षतेखाली, दीप प्रज्वलन पंचायत समितीचे सभापती तेजराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका विद्या चौधरी, प्रतिभा शिक्षण संस्थेचे सचिव पंकज चौधरी ,उद्योजक सौरभ हाडके ,जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरी बघेले, वडेगावचे सरपंच शामराव बिसेन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए डी पटले, व्ही व्ही मेश्राम, उपसरपंच दिलेश्वरी गौतम, जयप्रकाश पटले ,दिपाली टेंभेकर, श्रीकांता सोनेवाने, मीनाक्षी जगणे, रामलाल रहांगडाले, चंद्रकांत टेंभरे, मीनाक्षी ठाकरे, दीपिका बोपचे, एम डी ठाकरे, बोरगावचे सरपंच ज्योती देशमुख, शिशुपाल रहांगडाले, रुपेश्री राणे, रजनी बिंझाडे, रज्जू अंबुले ,माजी पर्यवेक्षक जे डी बोदेले ,यु एफ टेंभरे, चंद्रपाल कावळे ,रणवीर कोटांगले ,सुजाता रामटेके, महेंद्र कुमार मेश्राम ,रुमनबाई पटले, बजरंग चव्हाण, माया बोपचे, दिलीप कोळवते, प्रकाश भगत ,प्रल्हाद कटरे, देवराज रांगडाले, योगराज बघेले, यशवंत पटले ,प्रमोद बांते, विनोद राणे, महेंद्र रांगडाले ,यादवराव बीसेन, दुर्जन भगत, प्राचार्य डी आर गिरीपुंजे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .

यावेळी पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण यांनी आपल्या कणखर भाषेत विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही बी चौधरी यांनी आपली शाळा आपण कशासाठी काढली आपला उद्देश काय होता यावर सविस्तर प्रकाश टाकला तसेच याप्रसंगी जि प सदस्य तूमेश्वरी बघेले यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यास हे प्रगतीचे सहाय्यक असून प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे असे सांगितले .तर प्राचार्य डीआर गिरीपुंजे यांनी शाळेचा रोपट्याचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले आणि शाळा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कशा रूपाने नावारूपाला आली हे सांगून विद्यार्थ्यांना स्थळ दिशा व दशा याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन आर एस मेश्राम, प्रास्ताविक प्राचार्य डी आर गिरीपुंजे, आभार प्रदर्शन विवेक बन्सोड यांनी केले .यशस्वीतेसाठी स्नेहसंमेलन प्रमुख एस पी भगत, जी एन बीसेन ,ए बी राठोड, जे सी लांजेवार ,गायत्री बिसेन, नंदा बोरकर, उत्कर्ष बोरकर ,विवेक बन्सोड, नामदेव अटकुलवाड ,वर्षा उपरीकर, एस के कटरे ,व्ही व्ही मेश्राम ,विनोद धावडे, संगीता वालदे यांनी मोलाचे सहकार्य केले.

blank