
berartimes.com तिरोडा,दि.25-हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक तिरोडा विधानसभा मतदारसंघात उभारण्यात यावे,या मागणीचे निवेदन आमदार विजयभाऊ रहांगडाले यांना देण्यात आले.युवा सेनेचे कपिल भोंडेकर यांच्या नेतृत्वात आ.रहागंडालेना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली,त्यावेळी खुशाल राउत,अमित आगाशे,राहुल उके,हर्शल गजभिये,राहुल तरारे,भुवन पटले व इत्तर शिवभक्त उपस्थित होते.