24.1 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home महाराष्ट्र पुण्यात लाखोंच्या जनसमुदायात मराठा मोर्चाची सांगता

पुण्यात लाखोंच्या जनसमुदायात मराठा मोर्चाची सांगता

0
19

पुणे ,दि.25: मराठा क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आवळली असून, महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ विधान भवनावर रविवारी धडकला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा करावी, या मागण्यांसाठी मराठा समाज पुण्यात रस्त्यावर उतरला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी झाले होते. राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राज्यमंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, भाई जगताप यांच्‍यासह राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांची या मोर्चाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती होती.जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मागण्याचे निवेदन सादर करुन मोर्चाच्या समारोप करण्यात आला.