33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ दिव्यांगांनी आत्मनिर्भर होने ही काळाची गरज- श्रीमती दिक्षा दंडे.

दिव्यांगांनी आत्मनिर्भर होने ही काळाची गरज- श्रीमती दिक्षा दंडे.

0
104

_दिव्यांग दिक्षा दिंडे नी साधला गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांशी संवाद !_

गोंदिया- दिव्यांग बांधवांसाठी शासना द्वारा विविध योजना राबविण्यात येतात. याचा लाभ सुद्धा आपले बांधव घेत असतात. परंतु फक्त शासकीय योजनांच्या वर निर्भर न राहता स्वतः आत्मनिर्भर होऊन समाजाचा एक उत्पादक घटक म्हणून स्थान मिळविणे ही आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील दिव्यांग श्रीमती दिक्षा दिंडे यांनी केले. त्या आपल्या महाराष्ट्राच्या सामावेशीत यात्रे दरम्यान गोंदिया येथे आल्या असता दिव्यांग बांधवांशी संवाद साधतांना बोलत होत्या.
पुणे येथील श्रीमती दिक्षा दिंडे ह्या जन्मापासून दोन्ही हात व पायाने दिव्यांग असून संपूर्ण राज्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या ऐकण्यासाठी महाराष्ट्रात समावेशीत यात्रे द्वारा विविध भागातील लोकांशी, अधिकारी, विविध संस्था यांच्याशी संवाद साधत आहेत.blank
काल गोंदिया जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले असता जिल्हाधिकारी श्री प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर यांनी आयोजन केले होते. या संवाद कार्यशाळेला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. दिगंबर म्हरसकोल्हे, जिल्हा समन्वयक विजय ठोकणे तथा गोंदिया जिल्हा दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्ठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पुनर्वसन केंद्राच्या विशेष शिक्षिका सौ. प्रगती ठोकणे, फिजिओथेरपिस्ट डॉ. दीपिक्षा चव्हाण, डॉ. कु. दिव्या अग्रवाल, डॉ. सुजाता फुलझले, हरिओम कवाडकर, कु. नेहा लिल्हारे व कु. स्वाती खोटेले यांनी अथक परिश्रम घेतले.