27.6 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home विदर्भ दिशा समितीची बैठक आज

दिशा समितीची बैठक आज

0
40

 गोंदिया, दि.१६ : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

          यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे नरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय शिक्षा अभियान, यासह 37 विषयांचा आढावा घेणार आहेत.

          दिशा समिती ही केंद्र सरकारच्या योजनांवर देखरेख ठेवणारी अत्यंत महत्वाची समिती असून, या समितीच्या माध्यमातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचा योग्य वापर, कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर भर दिला जातो. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे, विकासकामांना गती देणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविणे हा या दिशा समिती बैठकीचा मुख्य उद्देश आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्यासह यंत्रणांचे जिल्हा प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.