27.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home विदर्भ ओबीसींनी गडचिरोलीत केला चक्काजाम

ओबीसींनी गडचिरोलीत केला चक्काजाम

0
26

berartimes.com गडचिरोली,दि.२६ :: ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, १९ जून २०१४ ची राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी व नोकरभरतीत गैरआदिवासींना प्राधान्य द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज ओबीसी समाज संघटनेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.ओबीसी समाज संघटनेचे नेते रमेश मडावी, नरेश महाडोरे, प्रवीण घाटे, सोनाली वरगंटीवार, ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर गव्हारे, केशव सामृतवार, विनायक कुनघाडकर, वामन म्हशाखेत्री आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शने करुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपची मंडळी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आली. परंतु दोन वर्षे होऊनही त्यांनी ओबीसींचे प्रश्न सोडविले नाही, भाजप सरकार ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.