
नागपूर, दि. 27 – शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयांच्या दर्जासंदर्भात सकारात्मक पावले उचलली नाही, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपराजधानीत पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्यात भाजपा आघाडीची सत्ता असूनदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभाविपने काढलेला मोर्चा हा शासनाला घरचा अहेरच मानण्यात येत आहे.