
जालना –आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात समोर आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणाऱ्या सरकारी बाबूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपींमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केलेले अनुदान गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, येथील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने एक भयानक कट रचला.बनावट नावे आणि नोंदी करून ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत घुसडण्यात आली धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे ‘लॉगिन’ आणि ‘पासवर्ड’ चोरून प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आले. घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला.
आर्थिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
न्यायालयानेही फटकारले; अटकपूर्व जामीन फेटाळला
मालमत्ता जप्त होणार, बँक खाती सील!





