देवरी,दि.०६- विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यासात आपले मन रमवून प्रामाणिकपणे शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास केले,तर कुठल्याही परीक्षेत यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही असे विचार देवरी आदिवासी एकात्मिक विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी केले.यावेळी त्यांनी प्रकल्प कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत पुराडा येथील मिशन स्काॅलरशिप प्रशिक्षण वर्गाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी हितगुज केले.आणि स्काॅलरशिप परीक्षेत यशस्वी होणार्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाकडून १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, पुराडा येथे ५ फेब्रवुरालीला वर्ग १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कमल कापसे होते.साहित्यिक कालिदास यांच्या कथेनुसार मनात ठाणून यश संपादन करता येते,जिवनात अशक्य असे काहीच नाही फक्त तुमची जिद्द चिकाटी आणि मेहनत आवश्यक असल्याचे कापसे यावेळी म्हणाले.
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे निरोप समारंभाचा कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वर्ग१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना पेन स्वरूपात भेट देण्यात आली तर वर्ग १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली.या कार्यक्रमात प्रामुख्याने शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा येवले, हिमांशू कुमरे,तर आभार प्रदर्शन वैशाली टेकाम हिने केले.





