38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोंदिया येथे डीआरएम कार्यालय सुरु करा :माजी सभापती अशोक लंजे

गोंदिया येथे डीआरएम कार्यालय सुरु करा :माजी सभापती अशोक लंजे

0
73

blank

गोदिया :रेल्वे मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जबलपूर-चंद्रपूर आणि गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला मंजुरी दिली. ही दिलासादायक बाब आहे. गोंदिया हे व्यस्त रेल्वे स्थानक असून दररोज जवळपास १०० एक्सप्रेस, लोकल, डेमू व मालगाड्या येथून धावतात. हे बिलासपूर झोनमधील सर्वाधिक महसूल देणारे स्थानक असून महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर आहे. नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प, कचारगड, प्रतापगड, मांडोदेवी जवळ असल्याने येथे विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, वैनगंगा एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस सारख्या गाड्या धावतात गोंदिया मध्यवर्ती ठिकाण असल्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय सुरू करावे व नागपूरसाठी महाप्रबंधक (झोनल) कार्यालय उभारावे, अशी मागणी माजी जि.प. सभापती अशोक लंजे यांनी अनेकदा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन केली.

जबलपूर चंद्रपूर रेल्वे मार्ग तसेच गोंदिया चंद्रपूर रेल्वेमार्गाचे दोहरीकरणास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूरी दिली आहे. या बाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भारत सरकार यांचे माजी सभापती अशोक लंजे यांनी मनपूर्वक आभार मानले आहे.
हे स्थानक महाराष्ट्रच्या पूर्व टोकावर असून पर्यटनाला वाव देणारा जिल्हा असून त्या मध्ये प्रामुख्याने नवेगाव नागझीरा व्याघ्घ्र प्रकल्प कचारगड, प्रतापगड मांडोदेवी असे अनेक प्रकारचे प्रसिध्द प्रेक्षणिय स्थळे आहेत. गोंदिया येथून, विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, रायगड जनशताब्दी, बरोनी एक्सप्रेस तसेच मुक माटी वैनगंगा एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस अनेक रेल्वे गाड्या धावतात. गोंदिया हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे भविष्यातील व्यस्थापक देखभाल इतर सुविधा वेळेवर मिळण्याबावत विचार करुन विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय गोंदिया येथे सुरु करावे तसेच नागपूर मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे महाप्रबंधक कार्यालय (झोन) सुरु करावे असे एका निवेदनाद्वारे माजी सभापती अशोक लंजे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेले आहे.                                                                                                      सौंदड येथे थांब्याची मागणी
गोंदिया-बल्लारशा मार्गावरील सौंदड रेल्वे स्थानकावर गाडी क्र. १२८५१-५२ (बिलासपूर-चेन्नई) आणि १२२५१-५२ (वैनगंगा एक्स्प्रेस) यांचा थांबा १५ वर्षे सौंदड येथे होता. पण कोविडनंतर बंद झाला असून अद्याप सुरू नाही. जबलपूर-चंद्रपूर गाडी क्र. २२१७३-७४ चा थांबा सौंदड, अर्जुनी मो., सिंदेवाही येथे द्यावा, अशी मागणी केली आहे.वरील गाडीचा थांबा न दिलास रेल्वे प्रशासना विरुध्द जन आदोलन करुन तसेच रेल्वे रोको आदोलन करण्यात येईल अशा इशारा उका प्रत्रकाद्वारे प्रशासणाला दिले

blank