गोरेगाव,दि.२७ः तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक २ मध्ये सोलर पाणी टाकी व नळयोजनेचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद सभापती डाॅ.भगत यांच्या स्थानिक निधीतून ही योजना मंजूर करण्यात आली असून ग्रामस्थांच्या पाण्याच्या समस्येवर हा एक प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय ठरणार आहे.
सोलर पाणी टाकीमुळे विजेची बचत होऊन पर्यावरणपूरक पद्धतीने शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यामुळे वॉर्ड क्रमांक २ मधील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यापुढेही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
यावेळी प्रेमलता राऊत सरपंच, राजा खान उपसरपंच,बी.जी.कटरे माजी उपसरपंच,सचिव अरविंद के. साखरे,सदस्य भाऊलाल कटरे,दिनेश दीक्षित,चंद्रशेखर सहारे,चुनीलाल चाचरे,सौ.शामकलाताई खंडवाये,सौ. सरिताताई सुरजोसे, माधुरीताई चौधरी, भूमेश्वरीताई पारधी,आम्रपालीताई राऊत,सौ. संगीताताई सरजारे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधोराव हनवत, प्रमोद येडे, टुकेंद्र भगत, माधुरीताई बोमले,वनिता राउत,संजय गल्पल्लीवार, रोहित पांडे, शिवा बिसेन,सुनील वाघाळे, रवी गामधरे उपस्थित होते.





