28 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home क्रीडा प्रणव कोरडे विजेता अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत

प्रणव कोरडे विजेता अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत

0
22

सौभाग्य नगर (हैदराबाद),- येथे पार पडलेल्या २३ फेब्रुवारी 2026 च्या आठवड्यात आज दिनांक 27 फेब्रुवारी शुक्रवार रोजी: ऍश टेनिस अकादमी ऑल इंडिया आयटा पुरुष १ लाख (AITA MEN’S 1 LAKH TOURNAMENT ) राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरातील तरुण प्रतिभावान उद्यान्मुख खेळाडू प्रणव कोरडेच्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एश टेनिस अकॅडमी हैदराबाद येथे २३ ते २७ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या अखिल भारतीय स्पर्धेत प्रणवने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारून आपल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद प्राप्त करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रणवने प्रथम फेरीत नैसिक रेड्डी याचा (३.६)(७.६)(७.४) असा पराभव करून दुसऱ्या फेरी म्हणजेच उपांत्यपूर्व फेरी प्रवेश केला त्याचा सामना अनिश रांजळकर याच्याबरोबर झाला व त्याचाही त्याने
(७.६)(१२,१०)(६.४) असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश करून राजेश्वर रेड्ड याला ६-२, ६-१ ने नमवले. व सेमी फायनल मध्ये त्याचा सामना वर्ल्ड युनिव्हर्सिटी मध्ये भारतातर्फे सहभागी झालेला खेळाडू तीर्थ शशांक याच्या बरोबर झाला त्यालाही त्याने(6.3) (2.0) निवृत्त असे एकतर्फी सामन्यात पराभूत केले व अंतिम सामन्यात प्रवेश केला त्याचा 27 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना नामांकित खेळाडू शिवदीप कोसराजू याच्याबरोबर झाला.उत्कंठावर सामन्यात प्रणव कोरडेने अतिउच्चे दर्जाची खेळी करून सरळ सेट मध्ये (७.५)(७.५) असे पराभूत करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले.प्रणव कोरडे ह्या प्रतिभावान आणि मेहनती खेळाडूला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले असून, सध्या तो हैदराबाद येथील सुरेश कृष्णा टेनिस अकॅडमीत सध्या नियमित आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करीत आहे.

त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नुकताच प्रणव कोरडे याचा बारा असोसिएशन ऑफ हायकोर्ट संभाजीनगर च्या वतीने सत्कार करण्यात आला होता तसेच या यशोगाथेचे महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत साहेब, ग्रामीण पोलीस आयुक्त विनायक कुमार राठोड, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती हिराभाईजी दोशी, देवगिरी प्रांत अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत अदवंत साहेब, सीनियर कौन्सिल संजीव देशपांडे साहेबआणि मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील ॲड. अमरजीत गिरासे साहेब यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.