
गोंदिया,दि.२८ः- सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गोंदिया येथे बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दंडार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या दंडार महोत्सवात नुतन कल्पना दंडार मंडळ बोथली,ता.सडक अर्जुनीच्यावतीने शाहीर मंसाराम भोयर,पोमेश्वर हिरालाल चव्हाण यांनी ग्रामस्वच्छतेवर उत्कृष्ठ सादरीकरण करुन मंत्रमुग्ध केले.यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सहाय्यक संदीप शेंडे,अधीक्षक खडसे,अलंकारजी टेंभुर्ण,ज्येष्ठ कलावंत चुडामन लाजेवार,हिम्मतराव यावलकर,अशोक हुमने,युवा शाहीर राहुल लांजेवार, प्रचार व प्रसार प्रमुख गजानन प्रतापगडे व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून महाराष्ट्र गीताने दंडार महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.





